मूळव्याध होण्याचे सर्वात मोठे आणि महत्वाचे कारण म्हणजे आपली बदललेली आणि खराब जीवनशैली हेच आहे. सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपण व्यायामाकडे पूर्ण दुर्लक्ष के ले आहे. आपण धकाधकीच्या जीवनामध्ये बाहेरील खाद्यपदार्थ चायनीज वगैरे खाण्यावर विशेष भर देतो. यामुळे आपल्या आहारामधून आपल्या शरीराला हवे असलेले फायबर आणि विविध जीवनसत्वे अजिबात मिळत नाहीत. यामुळेच भारतामध्ये आताच्या घडीला जवळपास 4 लाख 40 हजार रूग्ण हे मूळव्याधाचे आहेत. विशेष म्हणजे सातत्याने मूळव्याधाच्या रूग्णांची वाढ ही भारतामध्ये होताना दिसते आहे.
मूळव्याधाची समस्या कमी करणेसाठी पाैष्टीक पदार्थांचा आहारामध्ये समावेश करायला हवा. शिवाय पाणी जास्त पिले पाहिजे.